नवी दिल्ली: वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राम मंदिरांच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी रा मंदिराच्या मुद्द्यावरून मुस्लीम समाजाला थेट इशाराच दिला आहे. ते रविवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतातील मुस्लीम हे मुघलांचे नव्हे तर प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी राम मंदिराला विरोध न करता त्याचे समर्थनच केले पाहिजे. अन्यथा देशातील हिंदू समुदाय नाराज होईल. त्यांच्या तिरस्काराचा अग्नी भडकला तर काय परिणाम होतील, हे मुस्लिमांनी लक्षात ठेवावे, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराचा मुद्दा हा कर्करोगाच्या आजाराप्रमाणे झाला आहे. सध्या हा कर्करोग दुसऱ्या टप्प्यात आहे. लवकरच राम मंदिर उभारले नाही तर सर्व परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा थेट इशाराच त्यांनी दिला. 


देशातील अनेक भाग असे आहेत की ज्याठिकाणी आणखी २० वर्षांनी हिंदूंना ब्र देखील उच्चारता येणार नाही. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने घसरत आहे. त्यामुळे आता सर्वधर्म समभाव शिकवायचा असेल तर तो मुस्लिमांना शिकवावा. हिंदूंचे प्रमाण घटले तर सामाजिक समरसता नष्ट पावेल. याच्या रक्षणासाठी मी प्रसंगी मंत्रीपद आणि खासदारकी सोडायलाही तयार असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले.