COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पणजी : उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मित्रासोबत आलेल्या एका २० वर्षीय युवतीवर तीन जणांनी सामूहिक बलात्काराची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मडगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेताळभाटी बीचवर ही घटना घडलीय.


या प्रकरणातील तिन्ही आरोपींना कोलवा पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे तिन्ही संशयित मध्यप्रदेशातील इंदुर येथील असून पर्यटनासाठी ते गोव्यात आलेले असताना त्यांनी तरुणीवर बलात्कार केला. 


गोव्यातीलच प्रेमी युगुल गुरुवारी सायंकाळी ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेताळभाटी येथील या बीचवर आले होते. हा बीच निर्जन असून रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ते परतण्याच्या तयारीत असताना हे तीन संशयित त्यांच्याकडे आले. 


सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडून पैसे मागितले. मात्र, त्या युवतीच्या मित्राकडे केवळ २०० रुपयेच होते. त्यामुळे संतापलेल्या चोरट्यांनी त्या दोघांना जवळच्या झाडीत नेलं आणि तिथे तरूणीवर बलात्कार केला. या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.