Girl Boy Viral Video : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lukhnow) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रेमी युगुल धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कदीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लखनऊ सेंट्रल झोनच्या पोलिस उपायुक्त अर्पणा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांना शोधण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या दोघांविरोधात मोटर व्हेइकल अॅक्ट म्हणजेच वाहन कायद्याबरोबरच अश्लीलता पसरवल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे.


काय आहे व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ लखनऊमधील हजरतगंजमधील आहे. या व्हिडीओमध्ये स्कूटीवरील तरुण तरुणी शहरातील रस्त्यांवर धावत्या गाडीवर अश्लील चाळे (Obscene Act) करताना दिसत आहेत. स्कूटीवरुन जात असतानाच ही तरुणी गाडी चालवत असलेल्या तरुणाच्या पुढे बसली आणि तिने या तरुणाकडे तोंड केलं. या तरुणीने आपल्या दोन्ही पाय या मुलाच्या कंबरेभोवती ठेवल्याचंही दिसत आहे. ही तरुणी या तरुणाला मिठ्या मारत असून त्याचं चुंबन (Girl Boy Kissing Video) घेताना दिसत आहे.


लखनऊच्या रस्त्यावर फिल्मी स्टाइल स्टंटबाजी करतानाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलगा गाडी चालवत असताना वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत हे दोघे रोमान्स करताना दिसत आहे. ही मुलगी या मुलाच्या जवळजवळ मांडीवर बसली असून गाडी वेगाने धावत असताना हे सारे चाळे सुरु असल्याचं दिसतं. चालकानेही हेल्मेट घातलेलं नाही. 



अनेकांनी केली टीका


रस्त्यावर सुरु असलेला हा सारा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला. काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हा सारा प्रकार कैद केला. त्यापैकीच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घातलताना हे दोघे इतरांचा जीवही धोक्यात घालत असल्याची टीका अनेकांनी केली आहे. सामाजिक दृष्ट्याही हे कृत्य फारच चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लखनऊमधील हजरतगंज पोलिसांनी तपास सुरु केला आहे.