मुंबई : सोशल मीडियाच्या या युगात सर्वांनाच लोकप्रिय व्हायचे आहे आणि यामुळेच युजर्स इन्स्टाग्राम रील आणि फेसबुकच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करतात. आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी मेट्रोमध्ये नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ 50 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादालाही सुरुवात झाली असून त्यात सार्वजनिक ठिकाणी असे व्हिडीओ बनवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हायरल व्हिडिओ हैदराबाद मेट्रो स्टेशनचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ हाय हैदराबाद नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक मुलगी थंडानंदवर या गाण्यावर नाचताना दिसत आहे, जे पूर्वा सुंदरनिकीचे प्रोमो गाणे आहे. या व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देण्यात आले आहे की, 'हैदराबाद मेट्रोवर डान्स, हे कधी झालं?' सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली असून लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.



मेट्रोमधील डान्सच्या या व्हिडिओचे काही लोक कौतुक करत आहेत आणि मुलीला बेधडक असल्याचे म्हणत आहेत. तर काही नेटकऱ्यांचं मत आहे की सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी असं कृत्य करणं म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे. या सोबत मुलीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काही लोकांनी केली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहे. 


 या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'अशा निरुपयोगी गोष्टींचा प्रचार करू नका, मेट्रो ही तुमची खासगी मालमत्ता नाही.' दुसर्‍या नेटकऱ्याने कमेंट केली की, 'तिने दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले नाही, तिने कोणाचाही मार्ग अडवला नाही, मी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करतो!' सोशल मीडियावर असे डान्सचे बरेच व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. कधी कोण कुठे डान्स करताना दिसतं तर कधी कुठे. मध्यांतरी एका युट्यूबरने रस्त्यावर सिग्नल लागल्यानंतर डान्स केला होता. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.