नवी दिल्ली : बिहार पोलीसांनी बेगुसराय जिल्ह्यातील वेश्यालयातून दोन महिलांना सोडवले. या महिलांनी नोकरीचे आमिष दाखवून वेश्यालयात नेण्यात आले होते आणि देहविक्रीसाठी त्यांच्यावर जबरदस्ती होत होती. खरंतर एक मुलगा चार वर्षापासून आपल्या बहिणीला शोधत होता. एकदा नकळत तो बिहारच्या रेड लाईट एरियात पोहचला. तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.


शोधल्यावर तर देव देखील भेटतो...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोधल्यावर तर देव देखील भेटतो, तर माणूस काय ? असे बोलले जाते. ही म्हण या मुलाने खरी करून दाखवली. रमेश कुमार असे या मुलाचे नाव आहे. याची बहिण गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता होती. खूप शोध घेऊनही तिचा ती सापडली नव्हती. त्याचदरम्यान त्याने एका कंपनीत सेल्समनचे काम करायला सुरूवात केली. ते काम करत करत नकळत तो रेड लाईट एरियात गेला. तेथे त्याने आपल्या बहिणीला बघितले. त्यानंतर लगेचच त्याने पोलीसांना याबद्दलची माहिती दिली. 


दोघांना अटक 


खबर लागताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रमेशची बहिण आणि आणखी एका मुलीची या दलदलीतून सुटका केली. रमेशची बहिण ही बिहार येथील शिवहर जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहे. तर दुसरी महिला ही झारखंड येथे राहणारी आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे.


कशी पोहचली तिथे?


सुरूवातीला हरियाणातील एक महिला नोकरीचे आमिष दाखवून तिला बाखरी गावात घेऊन आली. त्यानंतर तिला विकले. दूसऱ्या महिलेला देखील १० वर्षांपूर्वी नोकरीचे आमिष दाखवून झारखंडमधून बिहार येथे आणण्यात आले होते. 
मात्र सुदैवाने रमेश तिथे पोहचला आणि त्याने पोलीसांच्या मदतीने या दोघींनी देहविक्रीच्या या दलदलीतून सुटका केली.