नवी दिल्ली : देशातील एका मोठ्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मध्यरात्री एक अशी घटना घडली ज्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा उभा राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांनी एका रुमला आग लावली आणि तोडफोड केली. २१ वर्षीय रागामोनिकाने प्राध्यापकाकडून अपमान झाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.


२१ वर्षीय रागामोनिका फर्स्ट इयरची विद्यार्थी होती आणि चेन्नई येथील  सत्यभामा विद्यापीठात इंजिनियरिंग करत होती. प्राध्यापकाने रागामोनिकाला रसायनशास्त्राच्या पेपरला कॉपी करताना पकडलं होतं. त्यानंतर तिला परीक्षा देण्यापासून रोखण्यात आलं होतं. यानंतर वसतिगृहातील खोलीमध्ये तिने फाशी घेतली.


विद्यार्थ्यांचा आरोप आहे की अपमान झाल्यामुळे तिने आतमहत्या केली. तिच्या आत्महतेची बातमी दुसऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी वस्तीगृहात तोडफोड केली. एका खोलीला त्यांनी आग देखील लावली. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.