रोमान्स करण्यासाठी प्रियकर प्रेयसीसोबत गेला OYO रुममध्ये, एका कृत्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं
Crime News : ओयो हॉलेटमध्ये प्रियकर प्रेयसीसोबत रोमान्स करण्यासाठी गेला होता. काही क्षणात त्या एका कृत्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Crime News : रोमान्स करण्यासाठी प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात जातात. नोएडामधील सेक्टर 27 मधील ओयो हॉटेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला घेऊन ओयो हॉटेलला गेला होता. रोमान्स करण्यासाठी गेले असताना त्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणांमुळे वाद झाला. या वादातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलं. (girlfriend boyfriend fight after lover ended his life noida oyo hotel room Crime News in marathi )
उत्तर प्रदेशातील 29 वर्षीय विक्रांत सिंह चौहान हा तरुन आपल्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करण्यासाठी हॉटेलला आला होता. त्या ठिकाणी ते दोघे बराच वेळ थांबले होते. कशावरुन तरी या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तरुणी हॉटेलमधून वॉशरुममध्ये गेली. मात्र काही वेळाने ती परत आल्यानंतर हॉटेलमधील रुमधील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती जोरजोरात ओरडून लागली. त्याचा आक्रोश ऐकून हॉटेलमधील कर्मचारी धावत आले.
हॉटेलमधील खोलीत विक्रांत यांने आपलं जीवन संपवलं होतं. यानंतर तरुणीने हॉटेल कर्मचारी आणि पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलीस पथकाने त्या तरुणाचं मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. दरम्यान एसीपीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस विक्रांतच्या सोबत असलेल्या तरुणीची चौकशी करणार आहे.
हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतही पोलिसांनी चौकशी केली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
हेसुद्धा वाचा - पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना
दुसरीकडे कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. एका व्यक्तीने संपूर्ण कुटुबांची हत्या केल्यानंतर त्याने आपले जीवन संपवलं आहे. हा व्यक्ती इंजिनियर होता आणि त्याने पत्नी आणि दोन मुलींचा गळा दाबून खून केला त्यानंतर स्वत:ताही आत्महत्या केली.