गर्लफ्रेंडने स्वत:च्या हाताची नस कापली! ती वाचली पण बॉयफ्रेंडचा मृत्यू; अखेरचे शब्द, `तिला...`
Girlfriend Cut Her Wrist Boyfirend Died: दिल्लीतील एका विचित्र घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेयसीला वाचवण्याच्या नादात त्याने प्राण गामावले.
Girlfriend Cut Her Wrist Boyfirend Died: दिल्लीमधील एका तरुणाचा अगदी विचित्र दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जोडीदाराबरोबर झालेल्या वादानंतर या तरुणाच्या प्रेयसीने आपल्या हाताची नस कापून घेतली. हे समजल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यावर या तरुणाचा अती रक्तस्राव पहिल्याच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा सारा प्रकार जगतपुरी येथे घडला आहे. या व्यक्तीच्या प्रेयसीने नस कापल्याचा व्हिडीओ काढून प्रियकराला पाठवला. त्यानंतर तो तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. तिथे तिला वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. मात्र एवढा सारा रक्तस्राव पाहून या तरुणालाचा कार्डिअॅक अरेस्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
यावरुन नेहमी व्हायचे वाद
एका वर्षापूर्वी हे दोघे ऑनलाइन माध्यमातून पहिल्यांदा एकमेकांशी बोलले. त्यानंतर हे दोघे नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात होते. हे दोघे नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डेट करु लागले. मात्र दोघांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन वाद व्हायचे, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या रिलेशनमधील तरुणाचं नाव अर्जुन असं होतं. अर्जुनने नोकरी शोधण्यावरुन त्याचं आणि त्याच्या प्रेयसीचा नेहमीच वाद व्हायचा. त्याने नोकरी शोधावी असं तिचं म्हणणं होतं. तर तो वारंवार पार्ट्यांना जायचा यावरुनही त्याच्या प्रेयसीचा आक्षेप असायचा. ही तरुणी कायदेविषयक शिक्षण घेत असून या क्षेत्रात करिअर करण्यावर ती ठाम होती.
त्याचे शेवटचे शब्द होते, 'तिला वाचवा...'
शुक्रवारी या दोघांमध्ये असाच वाद झाला. ही तरुणी केवळ अर्जुनबरोबरच नाही तर त्याच्या एका नातेवाईकाबरोबरही भरपूर भांडली. त्यानंतर ती तिच्या घरी गेली. रात्री साडेअकराच्या सुमारास तिने तिच्या हाताची नस कापून घेतली आणि तिने तो व्हिडीओ व्हॉट्अपवरुन अर्जुनला पाठवला. हा व्हिडीओ पाहून अर्जुन घाबरला. त्याने तातडीने प्रेयसीच्या आईला फोन करुन त्याबद्दल कळवलं. तो तिच्या मदतीसाठी तिच्या घरी पोहोचला. त्याने तिला गुरु तेज बहादूर हॉस्पीटलमध्ये रात्री पावणेतीनच्या सुमारास दाखल केलं. हॉस्पीटलला पोहचल्यानंतर नेमकं काय घडलं हे त्याने नर्सला समजावून सांगितलं. मात्र प्रेयसीला दाखल करुन घेण्यासाठी नेत असताना अर्जुनने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि तो जागेवर बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी अर्जुनच्या प्रेयसीच्या हातातून होणारा रक्तस्राव थांबवून तिचे प्राण वाचवले. मात्र तिच्या प्रियकराला म्हणजेच अर्जुनला कार्डिअॅक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला. बेशुद्ध होऊन पडण्याआधी, "तिला वाचवा... ती मरेल..." असं अर्जुन म्हणाल्याचं टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला
शवविच्छेदनानंतर अर्जुनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. अर्जुनच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेयसीने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. सध्या या तरुणीचं समोपदेशन केलं जात आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.