Stray Dogs Attack: छत्तीसगडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षांच्या एका मुलीला जीव गमवावा लागला आहे. कोरिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी वैकुंठपूर येथे मार्गदर्शन शाळेच्या जवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून शोक व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षाची सुकंती सकाळी 8 वाजता शौचास गेली होती. यावेळी भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. 


"घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास केला. प्राथमिक तपासात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मुलीने जीव गमावल्याचं दिसत आहे," अशी माहिती वैकुंठपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 


Viral Video: बैलाने 4 वर्षाच्या मुलाला आधी शिंगाने उडवलं आणि नंतर..., अंगावर काटा आणणारा Video व्हायरल


 


काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येही अशीच घटना घडली होती. एका चार वर्षांच्या मुलावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या करत त्याचे अक्षरश: लचके तोडले होते. या घटनेचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. सीसीटीव्हीत मुलगा रस्त्यावर असताना कुत्रे त्याच्यावर हल्ला करत असल्याचं कैक झालं होतं. हल्ल्यानंतर मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.


बैलाचा चार वर्षाच्या मुलावर हल्ला


मार्च महिन्यात अलिगडमध्ये (Aligarh) भटक्या बैलाने (Stray Bull) एका चार वर्षाच्या मुलाला अक्षरश: चिरडत गंभीर जखमी केलं होतं. ही घटनाही सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. 


व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलगा रस्त्यावर उभा असताना अचानक बैल तिथे येतो.  काही सेकंदात बैल मुलाला अक्षरश: हवेत उडवतो. त्यानंतर बैल त्या मुलाच्या अंगावर जाऊन बसतो. यानंतर एक व्यक्ती धावत येते आणि मुलाची सुटका करते.