Unloved Daughters: आईविना माया विश्वात नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आईच्या प्रेमाला कुठेच पर्याय नसतो. आईला आपण देवाची उपमा देतो. पण सर्वांच्याच नशिबी हे नसते. दुर्देवाने काही मुलांना आईचे प्रेम मिळत नाही. त्यांना सतत आईचा राग, दुर्लक्ष, द्वेष याचाच सामना करावा लागतो. हीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्यावर या नात्याचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. अशावेळी विशेषत: तरुणींनीमध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. त्यांना आयुष्यात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. 


कमी आत्मसन्मान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण आपल्याकडे कसं पाहिलं पाहिजे यासाठी याचा दृष्टीकोन पालक आपल्याला देतात. आपल्या जन्मापासूनच आईकडून आपल्याला प्रेम, सुरक्षितता मिळते. पण या गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्यात काहीतरी चूक आहे का? असे वाटते. आपल्यावर कोणी प्रेम का करत नाही? असेही वाटते. ही समस्या प्रेमळ आईच्या मुलामध्ये नसते पण प्रेम न करणाऱ्या आईमध्ये समस्या आढळू शकते.


आपली हद्द


लहानपणी आपल्या आईकडून प्रेम मिळाले नसेल तर नात्याच्या हद्द कुठपर्यंत असावी, कशी निर्माण करावी याची माहिती मुलींना नसते.
इतरांसोबत हद्द कशी स्थापित करावी हे कधीच तिला शिकायला मिळत नाही. आपल्या नात्यात आवड, भावना याने कोणाला काहीच फरक पडत नाही असे तिला वाटत राहते.


विश्वास


जेव्हा आई निर्दयी आणि क्रूर असते तेव्हा तिच्यावर कोणत्याही बाबतीत विश्वास ठेवणे कठीण होऊ शकते. माझी आई असं वागत असेल तर जगाकडून विश्वासाची काय अपेक्षा ठेवणार? अशी भावना मुलींमध्ये निर्माण होते. 


जवळीक


जेव्हा आपण आपल्या मातांशी ठाम असतो आणि स्वत:वर प्रेम करतो तेव्हा इतरांशी संपर्क साधण्याची क्षमता विकसित करतो. दुर्दैवाने, जेव्हा आपला आपल्या आईशी संबंध खराब असतो, तेव्हा आपण जगाशीदेखील तसेच वागतो. जगाशी संपर्क साधताना आपल्याला सतत असुरक्षित आणि चिंताग्रस्त वाटत राहते.


अतिदक्षता


अतिदक्षता हा गुण आपण लहानवयात पालकांकडून जसाच्या तसा घेत असतो. तुम्ही आजुबाजूला काय गोष्टी चालल्या आहेत याबद्दल जागृक आहात, असा त्याचा अर्थ होतो. आईकडून याकडे दुर्लक्ष झाले तर सर्व गोष्टी सारख्याच भासतात. 


IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या


स्वतःबद्दल विकृत भावना


आपल्याला काय आवडत, काय नाही, काय वाटत हे आईला सांगायला हवं. यातून आपण स्वतःला समजून घ्यायला देखील शिकत असतो. पण दुर्दैवाने प्रेम न करणाऱ्या आईच्या मुलीला ती कोण आहे? याबद्दल सतत खात्री नसते. त्यामुळे अनेकदा ती आपली ओळख बदलते.


मादक पदार्थांच्या आहारी


मादक पदार्थांच्या आहारी जाणे हे भावनिक दुर्लक्ष होण्यातील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. अगदी सुरुवातीपासून, जेव्हा आपल्याला प्रेम, आपुलकी आणि दुसर्‍या व्यक्तीशी खरा संबंध मिळत नाही, तेव्हा आपण हे आपल्या वातावरणातून शोधतो. त्यावेळी व्यसनाचा आधार घेतो.


'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी


इतिहासाची पुनरावृत्ती


लहान वयात आईचे प्रेम मिळाले नसेल तर मुली सर्व नात्यांकडे त्याच दृष्टीकोनातून पाहतात. कोणत्यात नात्यात विश्वास,आपुलकी नसते अशी त्यांची भावना निर्माण होते. त्यामुळे नात्यातल्या त्याच त्याच चुका त्या पुन्हा पुन्हा करतात. 


चिंता


लहान वयात आईचे प्रेम न मिळाल्यास किंवा आईचे दुर्लक्ष झालेल्या मुली सतत चिंतेत असतात. त्यांच्याकडे भावनिक दुर्लक्ष झालेले असते. अशावेळी उर्वरित जग आणि सर्वसाधारणपणे जीवनाबद्दल त्यांच्या मनात खूप चिंता दिसून येते.