गोवा निवडणुकीच्या यशामागे ते २ कोण? याचं सिक्रेट देवेंद्र फडणवीसांकडून रिविल
गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गोवा : गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा आज निकाल (Goa Assembly Election) लागला आणि याचे परिणाम जवळ-जवळ स्पष्टच आहे. आज म्हणजेच गुरुवारी निकालात भाजपाला सर्वाधीत मत मिळाले आहेत. याची औपचारिक घोषणा झाली नसली, तरी भाजपाच्याच हाती गोव्याची सत्ता असणार हे आता ठरलंचं आहे. या राज्यात भाजप आणि कॉग्रेस यांच्यात चुरस असली तरी येथील लहान मोठे पक्ष देखील आहेत आणि त्यांना आपण विसरुन चालणार नाही. ते जर भाजपासोबत जाऊन मिळाले तर भाजपचीच गोव्यात सत्ता येणार यात दुमत नाही. गोव्यातल्या या यशाबद्दल भाजपतर्फे उत्सव साजरा केला जात आहे. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीदेखील या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी दोन अशा लोकांची नावं घेतली, ज्यांच्यामुळे त्यांना ही निवडणूक जिंकणे शक्य झालं आहे.
कोण आहेत त्या दोन महत्वाच्या व्यक्ती?
गोवामधील हा निकाल कोणामुळे जिंकणं शक्य झालं आहे हे सांगत फडणवीस म्हणाले की, "भाजप नेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना गोव्यातील यशाचे श्रेय जाते. मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय त्यामुळे गोव्यात ही मतं मिळाली आहेत. लोक म्हणत होते की यावेळी जनता भाजपला नकार देईल. मात्र तसे झाले नाही. मत विभागूनदेखील नाही तर लोकांनी दिलेल्या पॉझिटिव्ह व्होटवर आम्ही निवडून आलो आहोत. त्यानंतर गोव्यातील या यशाचे श्रेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही दिले पाहिजे. गोव्यात डबल इंजिन सरकारने जे काम केलं आहे, त्याचाच हा विजय आहे."
गोव्यातलं सरकार कसं असेल?
गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु औपचारिक घोषणा झाल्यानंतर लवकरच या राज्यात पक्षाच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. परंतु सर्व लहानमोठे पक्ष आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना एकत्र घेऊन आम्ही सरकार स्थापन करु असं फडणवीस यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीचे बहुतांश जागांवरील निकाल हाती आले आहेत. काही प्रमाणात मतमोजणी अजूनही सुरु आहे. परंतु सध्या जी माहिती हाती आली आहे ती पाहाता भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे.