गोवा पोटनिवडणूक : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, विश्वजित राणे आघाडीवर
गोव्यातील पणजी, वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरुवात झालीय. पहिल्या फेरी आणि दुसऱ्या अखेर पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तर वाळपईमध्ये पहिल्या फेरी अखेर विश्वजित राणे आघाडीवर आहेत. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पणजी : गोव्यातील पणजी, वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरुवात झालीय. पहिल्या फेरी आणि दुसऱ्या अखेर पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तर वाळपईमध्ये पहिल्या फेरी अखेर विश्वजित राणे आघाडीवर आहेत. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. याशिवाय गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर तसेच अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने सार्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
वाळपईतून भाजपतर्फे विश्वजीत राणे आणि काँग्रेसचे रॉय नाईक तसेच अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.