पणजी : Goa Election Results : दिवंगत  माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. केवळ 800 मतांनी त्यांना आपली जागा गमवावी लागली आहे. भाजपचे उमेदवार बाबूश मॉन्सेरात हे विजयी झाले आहेत. उत्पल पर्रिकर यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने उमेदवारी नाकारल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. पणजीतून उत्पल पर्रिकर यांची आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजप विरुद्ध माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा असा सामना होता. यात कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता होती. मात्र उत्पल पर्रिकर यांचा निसटता पराभव झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांचा केवळ 800 मतांनी पराभव ढासा आगेय


दरम्यान, पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर 700 मतांनी पिछाडीवर होते. त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आपण भाजपला चांगली टक्कर देत असून निकालांवर लक्ष ठेवून आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी दिली. मात्र, त्यांचा 800 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर पणजीत भाजपने मोठा जल्लोष साजरा केला आहे.


पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांची पहिली प्रतिक्रिया


अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे, पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पराभव दिसताच उत्पल पर्रिकर मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले.