मुंबई : Goa Exit Poll 2022 :  उत्तर प्रदेशमधील मतदानाचा शेवटचा टप्पा आज संध्याकाळी 6 वाजता संपला. मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच यूपी, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरचे एक्झिट पोल हाती आले आहेत.. त्यामुळे कोणत्या पक्षाचे कोणत्या राज्यात सरकार स्थापन होऊ शकते, हे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. (Goa Exit Poll: Shock to BJP in Goa, big advantage to Congress)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी लागणार आहेत. एक्झिट पोलमधून कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सरकार बनते हे स्पष्ट होत नसले तरी कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे, याचा अंदाज नक्कीच येतो. 


2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. त्याचवेळी पंजाबमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले. Zee Exit Poll 2022 - एक्झिट पोलचे ताजे अपडेट्स हाती आले आहेत. Zee Exit Poll नुसार गोव्यात सत्ताधारी भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस प्लसमध्ये दिसून येत आहे. तसेच आपही आपले खाते उघडण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे सत्ता बदल होण्याचे संकेत मिळत आहे. जर सत्ता बदल झाला तर भाजपला हा मोठा धक्का मानला जाणार आहे.



- गोवाचा एक्झिट पोल : एकूण जागा - 40


भाजप (BJP) 13-18
काँग्रेस + (CONG)   14-19
गोमंतक + (MGP) 2-5
आप (AAP) 1-3 
इतर  1-3


- गोवाचा एक्झिट पोल : मतदान टक्केवारी


भाजप - BJP     31
काँग्रेस - CONG+ 33
मगोप - MGP+  12
आप - AAP  12
अन्य - OTH  12