गोव्यात काँग्रेसची `शिवसेना` होणार, काँग्रेस आमदारांचा `शिंदे पॅटर्न`
गोव्यात भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत
Goa Political Crisis : गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गोवा काँग्रेसचे आमदार शिंदे पॅटर्न राबवण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विधीमंडळाचा एक गट भाजपमध्ये (BJP) समील होणार असल्याची माहिती मिळतेय.
गेल्या काही दिवसांपासून दिगंबर कामत नाराज असून सध्या ते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तेच या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत कामत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचीही माहिती आहे.
सोमवारपासून गोव्यात विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीत काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजी राणे काँग्रेस आमदारांना पक्षात घेण्याच्या विरोधात आहेत. पण पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून त्यांनी याला मान्यता दिली आहे.
दिगंबत कामत यांनी भाजप प्रवेशाची माहिती आपल्या समर्थक आमदारांना दिली असून पक्षप्रवेशासाठी तयार राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणारे ते आठ आमदार कोण याबाबत सध्या गोव्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे.