मुंबई : सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी घसरले आहेत. सराफा बाजारात सोनं आणि चांदीचे भाव घसरले आहेत. स्थानिक सराफा बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव घसरला आहे. आज सोनं 100 रुपयांनी कमी झालं असून 32000 प्रति 10 ग्रॅम झाली आहे. याआधी सोमवारी सोनं 50 रुपयांनी कमी झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदीचे भाव


चांदीचे भाव देखील 200 रुपयांनी घसरले आहेत. चांदी  37000 रुपये प्रति किलो झाली आहे. सोन्याच्या खरेदीत गुंतवणूकदारांनी कमी विश्वास दाखवल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं स्वस्त झाल्याने भाव कमी झाले आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.9 टक्क्यांनी वाढून 1226 डॉलर प्रति औंस झालं आहे. दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्ध आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे 32,000 आणि 31,850 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. सोमवारी देखील सोनं 50 रुपयांनी स्वस्त झालं होतं.