नवी दिल्ली : लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हालाही सोनं खरेदी करायचं आहे? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.


काय आहेत सध्याचे दर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच सध्याचे दर काय आहेत.


सोनं महागलं


दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,९५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीसोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 


चांदीच्या दरातही वाढ 


चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात २५० रुपयांनी वाढ होत ३९,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात ०.४८ टक्क्यांची वाढ होत ते १,३५३.९० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदी ही ०.८५ टक्क्यांनी वाढ होत १६.६७ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.


दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: ३१,९५० रुपये आणि ३१,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.