नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु असुन सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी फार महत्वाची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.


दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत २२५ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर ३१,१७५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.


तर, चांदीचा दर ३९,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या किंमतीत झालेली घसरण आणि राजकीय अस्थिरतेमुळे परदेशात सोनं १३३१ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हालचाली आणि शिक्का निर्मात्यांकडून होणाऱ्या मागणीमुळे दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे.