सोनं झालं स्वस्त, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या
Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
Gold Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा एकदा घसरण झाल्याचे दिसतंय. भारतीय वायदे बाजारात सकाळी मौल्यवान धातूच्या किंमतीत घट झाली आहे. MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर 106 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 71,685 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर झाले आहेत, काल सोन्याचे दर 71,791 रुपयांवर स्थिरावले होते. तर, आज चांदी 100 रुपयांनी घसरली असून प्रति किलोग्रॅम 88,888 रुपयांवर स्थिरावली आहे. (Gold Rate Today 25th June)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मजबूत झाल्या असल्या तरी वायदे बाजारात मात्र घसरण झाली आहे. सोमवारी सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात अर्ध्या टक्क्याने वाढून 2345 डॉलरवर पोहोचला होता. तर, चांदी 30 डॉलरच्या आसपास पोहोचली होती. डॉलर कमजोर झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली. अमेरिकेत महागाईच्या आकडेवारीबाबत खलबतं सुरू आहेत. सप्टेंबरमध्ये पॉलिसच्या व्याजदरात आणखी स्पष्टता येण्याची शक्यता आहे. याआधी यूएस स्पॉट गोल्ड 0.54 टक्क्यांनी वाढून 2,332 डॉलर प्रति औंसवर पोहोचला होता. यूएस गोल्ड फ्यूचर 0.6 टक्क्याने वाढून 2,344 डॉलर प्रति औंसवर होता.
मंगळवारी सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली. २४ कॅरेट सोन्याची किंमत रु.१८०३.० ने घटून रु.७२६८.९ प्रति ग्रॅम आहे.२२ कॅरेट सोन्याची किंमत रु. १६५१.० ने कमी होऊन रु.६६५८.३ प्रति ग्रॅम झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 73,477 प्रति 10 ग्रॅमसाठी आहे. तर, सोमवारी सोन्याचा दर 74,928 10 ग्रॅमसाठी होता.
शुक्रवारी जाहीर झालेल्या यूएस मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेसचे पीएमआय डेटा अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत आल्यानंतर सोमवारी सोन्याच्या किमती घसरल्या, ज्यामुळे व्यापाऱ्यांना यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीच्या वेळेवर पुन्हा विचार करावा लागला, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.