मुंबई : Gold Price Today:  सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवडाभरात सोने दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. मल्‍टीकमोडिटी एक्‍सचेंजवर (MCX)10 ग्रॅम सोन्याचा दर 144 रुपयांनी घसला आहे तर चांदीचा दर 561 रुपयांनी घसरून प्रथमच 68,283 रुपये प्रति किलो पेक्षा खाली आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने दरात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे चार हजार रुपयांनी घट झाली आहे. आज सकाळी MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा फ्युचर्स भाव 144 रुपयांनी घसरून 51,420 रुपयांवर आला. त्याचवेळी, एमसीएक्सवर चांदीचा दर देखील 372 रुपयांनी कमी झाला आणि सकाळी चांदी 67,953 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. जवळपास महिनाभरात पहिल्यांदाच चांदी 68 हजार रुपयांच्या खाली आहे.


जागतिक बाजारात मंदी


बुधवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याचा भाव  1,923.60 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा दर 25.11 डॉलर प्रति औंस होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, क्रुडच्या किमती घसरल्याने आता गुंतवणूकदारांचा उत्साह पुन्हा बाजारात दिसून येत आहे.


सोने आयात 11 महिन्यांत वाढली


विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-फेब्रुवारीमध्ये भारतातील सोने आयात 73 टक्क्यांनी वाढून  45.1 अरब डॉलर झाली आहे. मागणी वाढल्याने सोनेची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 26.11 अरब डॉलर होती.


सोने आणि चांदीची किंमत www.ibjarates.com वर सकाळी आणि संध्याकाळी प्रसिद्ध केली जाते. या संकेतस्थळाद्वारे जारी केलेल्या दरावर, 3 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे जोडणे आवश्यक आहे.


सोन्याची शुद्धता कशी तपासायची


- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले असते.
- 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले असते.
- 21 कॅरेट सोन्यावर 875 लिहिले असते.
- 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले असते.
- 14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले असते.


अशा प्रकारे जाणून घ्या सोने-चांदीची किंमत


तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा किंमत तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून सहज माहित करु शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 8955664433 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.