नवी दिल्ली : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोनेच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक ज्वेलर्सकडून सोन्याच्या खरेदीत झालेल्या घटमुळे सोनं २७५ रुपयांनी स्वस्त झालं आहे.


२७५ रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोनं प्रती १० ग्रॅम ३०२७५ रुपये झालं आहे. त्याच प्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं.


चांदीच्या दरात ५२५ रुपयांनी घट झाल्याने चांदीचा दर ४०,००० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. इंडस्ट्रीयल यूनिट्स आणि शिक्का निर्मात्यांकडून मागणीत घट झाल्याने सोनं-चांदीच्या दरात ही घसरण झाली आहे.


व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय मुद्रेच्या तुलनेत डॉलर मजबूत स्थितीत पोहोचल्याने सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं.


स्थानिक बाजारातील ज्वेलर्स आणि रिटेलर्सतर्फे मागणीत घट झाल्याने सोन्याच्या किंमतींवर दबाव आहे. देशाची राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात क्रमश: २७५ रुपयांनी घसरण होऊन ३०२७५ रुपये आणि ३०१२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.


गुरुवारी सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं.