नवी दिल्ली : लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयाच्या मुहर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली असताना आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.


सोन्याच्या दरात मोठी वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३२,००० रुपये पार करत ३२,१५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.


चांदीही चांगलीच चमकली


चांदीच्या दरातही गेल्या दोन दिवसांत ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा दर ४०,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोनं १.०२ टक्क्यांनी वाढ होत १,३५२.८० डॉलर प्रति औंस झालं आहे. तर, चांदीही ०.६० टक्क्यांनी वाढल्याने १६.६५ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.


बाजारातील तज्ञांच्या मते, लग्नसराईचा काळ आणि अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त यामुळे सराफ बाजारात सोनं-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.