Gold Rate Today 30 November: दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता दिवाळी संपताच पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशांतर्गंत बाजारात सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर वाढला आहे. त्याचाचा परिणाम आता वायदे बाजारातही दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (Today Gold Silver Price on 30 November 2023 in India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारीही सोन्याचे 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 750 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळं तुम्हीदेखील लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या विचारात आहात तर आत्ताच सोन्याचे दर तपासून घ्या. 


गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 820 रुपयांनी वाढल्याने आज 6353.0 प्रतिग्रॅमवर स्थिरावली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतिग्रॅमसाठी 5825.0 हजारांवर स्थिरावली आहे. तर, एक किलो चांदीचा आजचा भाव 75,949 हजार इतका आहे. चांदी आज 623 रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत -0.94 % बदल झाला आहे. तर गेल्या महिन्यात -1.13 टक्के कमी दिसून आली आहे. 


तुमच्या शहरातील सोन्याचा भाव काय?


दिल्लीत सोन्याचा दर ६३,५३० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीची किंमत ७५,९४९ प्रति एक किलो आहे.


मुंबईत सोन्याचा भाव ६३,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत ७५,९४९ प्रति एक किलो आहे.


सोन्याच्या किंमतीत सतत होणारा चढ-उतार यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. गेल्या काहि दिवसांपासून सुरू असलेल्या हमास आणि इस्राइल यांच्यातील युद्धामुळं सोन्याच्या दराने उसळी घेतली होती. मात्र, दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव उतरले होते. मात्र दिवाळी संपताच सोन्याच्या दरात तब्बल सात महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. यामागे, सोन्याची वाढती मागणी, विविध चलनाचे मूल्य, सध्याचे व्याजदर, इतर देशातील चलनातील तफावत यामुळं सोन्याच्या दरातही चढ-उतार होत असतात.