मुंबई : संपूर्ण जगावार कोरोनाच सावट असताना आता आर्थिक मंदीचा प्रश्न देखील उभा राहिला आहे. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजापेठेत सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ होत असल्यामुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. दहा दिवसांपूर्वी सोन्याचे दर प्रतितोळा ४९ हजार रुपयांच्या घरात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर ५१ हजार ८५ रूपये आहे. सध्या सोन्याच्या दरांमध्ये तेजी-मंदी कायम आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सलग तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता देश अनलॉकच्या मार्गावर आहे. 


दरम्यान, सोन्यानंतर चांदीचे दर देखील गेल्या ७ वर्षात उच्चस्तरावर आहेत. मैल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये आलेल्या तेजीनंतर ETFमध्ये देखील गुंतवणूक वाढली आहे. शिवाय डॉलरमध्ये घसरण झल्यामुळे सोन्याचे दर वधारले आहेत. 


९ जून २०२० रोजी सोन्याचे दर ४९ हजार ३१८ रूपये प्रती तोळा होते, तेच आज ५० हजारांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.  कोरोनाचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर देखील झाला आहे.