सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहेत आजचे दर
दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
सोनं महागलं
दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,३५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
चांदीही चमकली
एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही ५० रुपयांनी वाढ होत ३९,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात घसरण होत ते १,३२५.२० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर चांदीच्या दरातही घसरण होत १६.३३ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.