नवी दिल्ली : सध्या लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.


सोन्याच्या किंमतीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.


वाढ झाली तरी सोन्याचा दर ३०,००० रुपयांपेक्षा कमीच


गुरुवारी सोन्याच्या दरात २३० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर २९,६६५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचल्याचं पहायला मिळालं.


चांदीच्या दरातही झाली वाढ


शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ६८० रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा दर ३८,२८० रुपयांवर पोहोचला आहे.


यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ


गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सलग घसरण होत होती. मात्र, आता सोनं-चांदीची वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला बदल यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.१७ टक्क्यांची वाढ होत ते १,२५७.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचले.


दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात २३०-२३० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: २९,६६५ रुपये आणि २९,५१५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.