नवी दिल्ली : सध्या लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, ऐन लग्नसराईतच सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.


सोन्याच्या किंमतीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.


सोनं महागलं


दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,७५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.


चांदीच्या दरातही वाढ


एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ५० रुपयांनी वाढ होत ३९,५५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: ३१,७५० रुपये आणि ३१,६०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.