Gold and Sliver Price Today: सोन्याच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ (Gold Price Hike) होताना दिसते आहे. सध्या लग्नसभारंभांचा मोहोल असल्यानं सोन्याच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळते आहे. कमोडिटी एक्सचेंजवरही (Commodity Exchange) सोन्याचे दर हे वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढउतार होताना दिसते आहे. महिला दिनापासून सोन्याच्या भावांमध्ये चढउतार होताना दिसत आहे. 24 कॅरेटच्या (Pure Gold Rates) सोन्यात सुरूवातीला घसरण पाहायला मिळाली होती. 8 मार्चला सोन्याचा भाव हा 55,630 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. (Gold and Sliver Price Today gold price hike today know the latest rates of gold sliver and platinum in your city)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोच 10 मार्चला वधारला आणि 56,070 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. हा भाव दुसऱ्या दिवशी वाढून 56,890 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. इतक्या दिवसांनी वाढल्यानंतर सोन्याचा भाव (Gold Price in Mumbai) हा 15 मार्चला उतरला होता. आज सोन्याचे भाव हे 58 हजारांच्या वर पोहचले आहेत. गेल्या मार्च पासून सोन्याचे भाव हे वाढताना दिसत आहेत तर चांदीचे भावही उतरताना दिसत आहेत. परंतु या किमतींमध्ये वरखाली होताना दिसत आहे. 


काय आहेत आजचे भाव? 


आज 24 कॅरेट सोनं हे 58,690 रूपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोनं हे 53,800 प्रति 10 ग्रॅम आहे. काल 1 ग्रॅमचे 22 कॅरेट सोनं हे 50 रूपयांनी वाढले होते. त्यातून 8 ग्रॅमचे 22 कॅरेट सोनं हे 400 रूपयांनी वाढले होते. 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोनं हे 52 रूपयांनी तर 24 कॅरेटचे सोनं हे 416 रूपयांनी वधारल्याचे रिपोर्ट्समधून (Gold Price in last 7 days) समोर आले आहे. 


काय आहे चांदीचे भाव? 


सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आज चांदीचे भाव हे 69,800 रूपये प्रति किलो इतके आहेत. त्यातून गेल्या 13 मार्च पासून चांदीचे भाव हे वाढताना दिसत आहेत. मार्चच्या सुरूवातीला सोन्याप्रमाणे चांदीचे भावही उतरताना दिसत होते. येत्या काही दिवसांमध्ये चांदीचे आणि सोन्याचे भाव अपेक्षेपेक्षा वाढू शकतात. तेव्हा आपल्यालाही काही गोष्टींची काळजी खरेदी करताना घ्यावी लागणार आहे. MCX वरही मोठ्या प्रमाणात सोन्याच्या आणि चांदीचे भाव खालीवर होताना दिसत आहेत. 


गुढीपाडव्याचा (Gudipadwa) सण अगदी काही दिवसांवरच आला आहे. मागच्या वर्षी सर्वांना गुढीपाडवा करोनानंतर संपुर्ण निर्बंधानंतर साजरा केला होता. यावेळीही गुढीपाडव्याची जय्यत तयारी असणार आहे. तेव्हा सोन्या-चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना दिसेल. 


(माहिती - विविध स्त्रोत)