नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजारातील चढ-उतार आणि स्थानिक बाजारातील घटती मागणी यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांची घसरण झाली. दुसरीकडे चांदीचे दर मात्र २०० रुपयांनी वाढत ते ३८,१०० रुपयांवर बंद झाले.


बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केल्यानंतर डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरावर याचा परिणाम झाला. 


जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमतीत साधारण घट होत ते १,२५५.१० डॉलर प्रति औंसवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात तेजी आल्याने त्याचा परिणाम सोन्यावर झाला. रुपया मजबूत झाल्याने सोन्याची आयात स्वस्त झाली.