नवी दिल्ली : ज्वेलर्सकडून सोन्याची मागणी तसेच जागतिक बाजारपेठेमधील सकारात्मकतेमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या दरात प्रतितोळा १०० रुपयांची वाढ होत ते ३०,५५० रुपयांवर पोहोचले. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळाली. 


या कारणामुळे सोन्याच्या दरात वाढ


व्यापाऱ्यांच्या मते गेल्या दोन महिन्यांपासून डॉलरची किंमत इतर आंतरराष्ट्रीय मुद्राकांच्या तुलनेत नीचांकी स्तरावर असल्याने गुंतवणुकदारांकडून सकारात्मक संकेत मिळाले. याशिवाय स्थानिक बाजारात लग्नसराईचा मोसम असल्याने मागणीही वाढलीये. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळतोय.


सिंगापूरमध्ये सोन्याचे दर


जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्यामध्ये ०.२७ टक्क्यांची वाढ होत ते १२९१.४० डॉलर प्रति औंस आणि चांदी ०.१८ टक्क्यांनी वाढत ते १७.०४ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. 


९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर


राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९. ५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर १०० रुपयांची वाढत अनुक्रमे ३०,५५० आणि ३०,४०० रुपयांवर पोहोचले. गेल्या दोन सत्रांत सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांची घसरण झाली होती.