मुंबई : सोन्याची किमतीत (Gold Price) चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावनेत काल थोडी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोने दरात १८३ रुपयांनी वाढ होऊन सोने पुन्हा ५० हजार रुपयांच्या घरात पोहोतले आहे. याआधी सोने प्रति तोळा ५४ हजारांच्या घरात पोहोचले होते. त्यानंतर सातत्याने घसरण होताना दिसत होती. चार दिवसांपूर्वी सोने दरात घट झाली होती. प्रति तोळा सोने ४७,९०० रुपयांपर्यंत खाली आले होते. आता पुन्हा सोने दरात वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी सोने दरात घट झाली होती. प्रति तोळा सोने ४९,९४६ रुपये झाले होते. काल सोने दरात वाढ झाली असून सोने ५०,००० रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम) झाले आहे. दरम्यान, सोने दरात घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. सोने ४२,००० पर्यंत खाली येईल असे सांगण्यात येत होते. मात्र, पुन्हा सोने दरात वाढ होताना दिसत आहे.


चांदीच्या दरात ११० रुपयांनी घसरण


सोने दरात वाढ होत असताना चांदीच्या किंमती  (Silver Price) घसरण होताना दिसत आहे. एमसीएक्सच्या (MCX) चांदीचा मार्च वायदा २३७ रुपयांनी कमी झाला. चांदी ६५२६२ रुपये प्रति किलो झाली आहे. काल चांदीचा व्यापार दर ६५४९९ रुपयांवर बंद झाला. 


जाणून घ्या कोठे किती आहे सोने किंमत?


वेबसाइट Gooreturns.in च्या माहितीनुसार दिल्लीत २४ कॅरेट सोने रेट ५२४३० रुपये प्रति १० ग्राम चालू आहे, ज्याचा काल ५२,४२० रुपये होता. कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने रेट ५०६६० दर प्रति १० ग्राम आहे, ज्यात काल ५०६५०  रुपये होते. मुंबईत २४ कॅरेट गोल्डचा भाव ४९,३३० पैसे आहे, जो काल ४९,३२० रुपये प्रति १० ग्राम आहे. चेन्नई २४ कॅरेट गोल्डचा रेट ५१,६३० रेकॉर्ड आहे, ज्यात काल ५०७९० रुपये प्रति १० ग्राम होते. तसेच सर्राफा बाजारात चांदीचा रेट कमी झाला तरी दिल्लीत चांदीचा ६५,५००  तर मुंबईतही भाव ६५,५००  रुपये दर किलो कोलकाता तसेच रेट ६५,५०० रुपये दर किलो आहे. चेन्नईमध्ये चांदीचा दर, रुपये, रुपये०० रुपये दर आहे जो काल, ६६,६०० रुपये दर किलो होता.


सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. पण आता अमेरिकेत राहत पॅकेजची अपेक्षा आहे. तसेच जपानमध्ये देखील दिलासा देणाऱ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. या प्रभाव सोने दरावर दिसून येत आहे. तसेच कोरोना संकटानंतर आता व्हॅक्सिन बाजारात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.