अक्षय्य तृत्तीयेनंतर सोन्याचे भाव कोसळले; 10 ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल
Gold-Silver Price on 13 May 2024: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. खरेदीला जाण्यापूर्वी आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Gold-Silver Price on 13 May 2024: अक्षय्य तृत्तीया झाल्यानंतर सोमवारी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. आज सकाळी भारतीय वायदा बाजारात (MCX)मध्ये सोनं आणि चांदीची चमक कमी झाल्याचे चित्र आहे. आज दोन्ही मौल्यवान धातुत घट झाली आहे. MCXवर सोनं 386 रुपयांनी घसरले असून आज सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 72,341 रुपये आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 72,727 इतके होते. मात्र, आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेच. तर, चांदीच्या दरातही 455 रुपयांची घसरण होऊन 84, 455 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी
सराफा बाजारात जरी मौल्यवान धातुच्या किंमतीत घट झाल्याचे दिसत असले तरीदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी असल्याचे पाहायला मिळतोय. युएसमध्ये स्पॉट गोल्ड 1 टक्क्यांने वाढून 2,369 डॉलर प्रति औंसवर ट्रेड होतोय. तर जून कॉन्ट्रेक्ट असलेले गोल्ड फ्युचरदेखील 1.5 पर्सेटवर उसळी घेतली असून 2,375 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.
तुमच्या शहरात किती आहे सोन्याचा दर
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ७२,५४० इतका आहे. तर, 22 कॅरेटसाठी 66,495 इतका आहे.
पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ७२,५४० इतका आहे. तर, 22 कॅरेटसाठी 66,495 इतका आहे.
नागपुरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ७२,५४० इतका आहे. तर, 22 कॅरेटसाठी 66,495 इतका आहे.
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ७२,५४० इतका आहे. तर, 22 कॅरेटसाठी 66,495 इतका आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मौल्यवान धातूच्या दरवाढीमागे, अमेरिकेत वाढलेल्या बेरोजगारीच्या दाव्यांवरील ताज्या आकडेवारीवरून श्रमिक बाजारात मंदीचे संकेत असल्याचे बोललं जातं. यामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह या वर्षी व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकन सेंट्रल बँक सप्टेंबरच्या बैठकीपासून व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल अशी, शक्यतादेखील वर्तवण्यात येतेय.