मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजेट 2018 मध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये सोन्याचा दर कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात अजिबात फरक झालेला नाही.  पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


सोन्याच्या दरात घसरण


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दर 150 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आता प्रति दहा ग्रॅम सोनं हे 31,250 रुपयांना मिळणार आहे. 


सोन्याचा दर प्रति तोळा 


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 150  रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 31,250  रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीच्या दरात वाढ


सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 100  रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर 40,300  रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात 150  रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: 31,250 रुपयांवर पोहोचला आहे.