सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे भाव
सणावारामुळे वाढलेल्या मागणीमुळे सोनं चांदीच्या भावांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : सणावारामुळे वाढलेल्या मागणीमुळे सोनं चांदीच्या भावांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं १०० रुपयांनी वाढून ३१ हजार रुपये तोळा झालं आहे. एका महिन्यामधला हा सोन्याचा सर्वाधिक भाव आहे. येऊ घातलेल्या सणांमुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केल्यामुळे भाव वाढले आहेत. तर चांदीची किंमतही ५० रुपयांनी वाढून ३८,३०० रुपये किलो झाली आहे.
दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१ हजार रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०,७५० रुपये तोळा झाली आहे. याआधी १७ जुलैला सोन्याचे भाव एवढे झाले होते. मागच्या दोन दिवसांमध्ये सोनं २८० रुपयांनी वाढलं.