मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. MCX वर दुपारी 12 वाजता सोन्याचे दर दहा ग्रॅम वर 0.40 टक्क्यांनी वाढून 47 हजार 227 रुपयांवर ट्रेड करत आहे. ऑक्टोबरमध्ये डीलिव्हरी करण्यात येणाऱ्या सोन्याचा भाव सध्या 179 रुपयांच्या वाढीसह 47 हजार 500 रुपयांच्या पातळीवर आहे. तर डिसेंबरमध्ये डीलिव्हरी केला जाणाऱ्या सोन्याचा भाव हा 364 रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 47 हजार 229 रुपयांवर ट्रेड करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. यावेळी सोने 1.45 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 1778.25 डॉलरच्या पातळीवर आहे. 1 जून रोजी IBJA च्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 263 रुपये होती.


आजचे मुंबईतील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 240 रुपये आहे. तर काल 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 190 रुपये आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, 10  ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 240 रुपये आहे. त्याचप्रामाणे कालचा 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 190 रुपये आहे. म्हाणजे कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे.


आजचे मुंबईतील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर



आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोनं अजूनही 9 हजार रुपयांपेक्षा स्वस्त आहे.


चांदीलाही वेग


सोन्यासह चांदीमध्येही आज वाढ होत आहे. सध्या जुलैमध्ये डीलिव्ह होणाऱ्या चांदीची किंमत 294 रुपयांनी वाढून 68 हजार 449 रुपये प्रति किलो झाली आहे.
सप्टेंबरमध्ये डीलिव्हर होणाऱ्या चांदीमध्ये 268 रुपयांची वाढ दिसून येत आहे, जी 69 हजार 388 रुपये प्रति किलो पातळीवर व्यापार करत आहे.


खरे पाहाता कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम सोन्याच्या भावावर पाहायला मिळत आहे, कोरोनाचा नवा स्ट्रेन पुन्हा आल्यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहे. परंतु नंतर काही भागात कोरोनाचा पॅझीटीव्हीटी रेट कमी झाल्यामुळे पुन्हा सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सोन्याच्या दरात अशी अस्थिरता पाहायला मिळत आहे.