चांदीला झळाळी, एका झटक्यात इतक्या रुपयांनी महागली; वाचा आजचे सोन्याचे दर किती?
Gold Price Today:आज सोन्याचे दर स्थिरावले आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Gold Price Today: कमोडिटी बाजारात मौल्यवान धातुच्या किंमतीत किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. सोन्यात नरमाई दिसून येत आहे तर चांदच्या दरांत तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. चांदी 500 रुपयांपेक्षा अधिक दराने उसळली आहे. वायदे बाजारात सोनं 76,421 रुपये प्रतितोळावर ट्रेड करत आहे. या दरम्यान चांदी 511 रुपये प्रति किलोग्रॅमने उसळी घेतली असून 88,903 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. मागील सत्रात 88,392 रुपयांवर स्थिरावली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळं शुक्रवारी सोनं 30 डॉलरने वधारुन 2640 डॉलरच्या जवळपास पोहोचले होते. तर, चांदी 2 टक्क्यांच्या तेजीने 30 डॉलरच्या वर पोहोचले होते. तर, वायदे बाजारात सोनं 700 रुपयांवी वधारुन 76,400 रुपयांवर तर चांदी 1200 रुपयांनी उसळी घेऊन 88,400 रुपयांवर स्थिरावली होती.
आज 24 कॅरेट सोन्याचे दर 77,450 रुपये इतके आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 71,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 58,090 रुपये इतके आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,450 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,090 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,100 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,745 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 809 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,800 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61,960 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,090 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 71,000 रुपये
24 कॅरेट 77,450 रुपये
18 कॅरेट- 58,090 रुपये