मुंबई : Gold Price Today 10th August 2022: गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये (Gold-Silver Rate) चढउतार पाहायला मिळालेत. RBI ने रेपो दरात वाढ केल्यामुळे भारतीय बाजाराचा कल बदलला आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारामधील उलाढालीमुळे सोने-चांदी दरात बदल दिसून आला. जागतिक बाजारातील घसरणीमुळे सोमवारी दरातही चढ-उतार दिसून आला. कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजही 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,960 प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold- Silver Price Today ) तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर 20 पैशांनी घसरले आहेत. 58,700 रुपये प्रति किलोला दर मिळत आहे.  गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,990 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,370 प्रति 10 ग्रॅम आहे. 


अशी सोने शुद्धता तपासा 


सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासता येते. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोने शुद्धता तपासू शकत नाही तर संबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहकाला या अ‍ॅपच्या माध्यमातून तात्काळ तक्रार करता येऊ शकते. 


शुद्ध सोने कसे ओळखाल?


24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.


22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.


21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875  लिहिलेले असते.


18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.


14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.