Gold Price Today : 9 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं; काय आहे आजचा भाव?
काय आहे सोने आणि चांदीचे आजचे दर?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. आज देखील सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. तर चांदी 70 हजार रूपयांवर व्यापार करत आहे. एमसीएक्स (MCX) वर सोनं 47 हजार 309 रूपयांवर व्यापार करत आहे. तर चांदीमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचे दर 70 हजार 425 रूपयांवर पोहोचलं आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे या महागड्या धातूची मागणी वाढत आहे.
सांगायचं झालं तर ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रूपयांवर पोहोचले होते. पण आता सोन्याचे दर 9 हजार रूपयांनी घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 44 हजार 449 रूपये आहेत तर 24 कॅरेट सोन्यासाठी 48 हजार 490 रूपये मोजावे लागत आहे. एक किलो चांदीसाठी 70 हजार 870 रूपये मोजावे लागत आहे.
या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर 60 हजार रूपयांवर पोहोचतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जर आपण सोन्याच्या गुंतवणूकीबद्दल बोललो तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे.