Gold price today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट; चांदीचे दरही घसरले
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घट
मुंबई : भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीही स्वस्त झाली आहे. जागतिक संकेतांमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज MCX वर सोन्याची किंमत 0.4 टक्क्यांनी कमी होऊन 47,406 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदी 0.19 टक्क्यांनी घसरून 65,208 रुपये प्रति किलोवर आली आहे. मागील सत्रात सोने 0.17 टक्के स्वस्त होते, तर चांदीचे दर 0.19 टक्के वाढले होते.
अमेरिकन डॉलरच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 1,826.75 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदी 0.4 टक्क्यांनी वाढून 24.76 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहेत. पण भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर
गुड्सरिटर्नच्या वेबसाईटनुसार; देशातील सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात. 7 सप्टेंबर रोजी मुंबईत सोन्याचे दर 47 हजार 530 रूपये आहे. तर दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये क्रमशः 50 हजार 910 रूपये, 48 हजार 850 रूपये , 49 हजार 650 रूपये आहे.
एक मिस्ड कॉल देवून जाणून घ्या सोन्याचे दर
आता सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोनाऱ्याच्या दुकानात जाण्याती गरज नाही. आता तुम्हाला घर बसल्या सोन्याचे दर जाणून घेता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल.