मुंबई : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जवळपास 60 हजार रूपयांवर पोहोचलेले सोन्याचे दर यंदाच्या वर्षी घसरले आहेत. सोन्याचे दर 47 हजार रूपयांपर्यंत घसरल्यामुळे ग्राहक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोन्याचे दर कमी झाली असली तरी रोज सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ज्या दिवशी क्रिप्टोकरन्सीची किंमत कमी झाली, भारतात सोन्याचे दर प्रति 100 ग्रॅम 1200 रुपयांनी कमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 22 कॅरेट सोन्याचे दर
गुड्सरिटर्नच्या वेबसाईटनुसार; देशातील सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात.  मुंबईत सोन्याचे दर 46 हजार 410 रूपये आहे. तर दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये क्रमशः 46 हजार 550 रूपये, 44 हजार 740 रूपये , 46 हजार 850 रूपये आहे. 


 24 कॅरेट सोन्याचे दर
गुड्सरिटर्नच्या वेबसाईटनुसार; देशातील सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात. 8 सप्टेंबर रोजी मुंबईत सोन्याचे दर 47 हजार 400 रूपये आहे. तर दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये क्रमशः 50 हजार 780 रूपये, 48 हजार 570 रूपये , 49 हजार 540 रूपये आहे. 


एक मिस्ड कॉल देवून जाणून घ्या सोन्याचे दर 
आता सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोनाऱ्याच्या दुकानात जाण्याती गरज नाही. आता तुम्हाला घर बसल्या सोन्याचे दर जाणून घेता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. मेसेजच्या माध्यमातून सोन्याचे दर तुम्हाला कळतील.