Gold Price Today : सोने आता महाग होणार का, तज्ज्ञांच्या मते कधी करावी खरेदी?
Gold, Silver Rate Update : गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले.
मुंबई : Gold, Silver Rate Update : गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. परंतु शुक्रवारी सोने-चांदीचे दर मोठ्या घसरणीसह बंद झाले. आज, MCX वर सोने बाजार एप्रिल वायदा 300 रुपयांनी वाढून सोने प्रति तोळा 46000 रुपये झाले. चांदीच्या दरातही 800 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.
MCX Gold: MCX वरील सोने एप्रिल बाजार आज प्रति दहा ग्रॅम 300 रुपयांनी वाढत उघडला. सध्या सोने दर प्रति तोळा 46040 रुपयांवर आहे. शुक्रवारी सोने दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, सराफा बाजार बंद होण्याच्या आधी काही तास सोने दरात घसरण पाहायला मिळाली. सोने बाजार 46,000 रुपयांच्या खाली बंद होऊन प्रति 10 ग्रॅम 45736 रुपयांवर बंद झाला.
गेल्या आठवड्यात सोने 1165 रुपयांनी स्वस्त
गेल्या आठवड्यात सोमवारी एमसीएक्सवरील सोने एप्रिल वायदा 46901 रुपयांवर बंद झाला. परंतु शुक्रवारी सोने व्यवहार प्रति 10 ग्रॅम 45736 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच ते प्रति 10 ग्रॅम 1165 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी एमसीएक्सचे सोनेदेखील 45611 रुपयांच्या खाली आले.
सोने 10,200 रुपयांनी स्वस्त
मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोने खरेदीवर भर दिला. यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोने किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. मागील वर्षी सोन्याने 43 टक्के परतावा दिला. उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचे भाव 17 टक्क्यांपर्यंत खाली गेले आहे. सोने दर दहा ग्रॅम 46,००० रुपयांच्या एमसीएक्स पातळीवर व्यवहार होत होता. म्हणजे जवळपास सोने 10,200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
गेल्या आठवड्यात सोने दर स्थिती
दिवस गोल्ड (MCX एप्रिल वायदा)
सोमवार 46901-10 ग्रॅम
मंगळवार 46802-10 ग्रॅम
बुधवार 46522-10 ग्रॅम
गुरुवार 46241-10 ग्रॅम
शुक्रवार 45736-10 ग्रॅम
MCX Silver : शुक्रवारी झालेल्या जोरदार घसरणीनंतर आज चांदीची किंमतही वाढली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवरील चांदीच्या मार्च व्यवाहारात 2000 रुपयांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. परंतु आज 800 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.
गेल्या आठवड्यात चांदी 3100 रुपयांनी स्वस्त
संपूर्ण आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास चांदीचा बाजार सोमवारी 70432 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी चांदीचा बाजार 67261 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला, म्हणजे चांदी गेल्या आठवड्यात 3171 रुपयांनी स्वस्त झाली आहे. शुक्रवारी चांदी देखील घसरून 66505 रुपये प्रतिकिलोवर आली.
1 फेब्रुवारी रोजी MCX वरील चांदीचा वायदा 74400 रुपयांवर गेला. चांदीची उच्च पातळी प्रति किलो 79, 980 रुपये आहे. यानुसार चांदीदेखील उच्च स्तरावरून सुमारे 11,900 रुपयांनी स्वस्त झाली. आज चांदीचा मार्च वायदा दर प्रति किलो 68, 066 रुपयांवर ट्रेट करीत आहे.
गेल्या आठवड्यात चांदीची स्थिती
डे सिल्व्हर (MCX एप्रिल वायदा)
सोमवार 70432 / किलो
मंगळवारी 69341 / किलो
बुधवारी 69543 / किलो
गुरुवार 69276 / किलो
शुक्रवार 67261 / किलो (रुपये)
सोने आणि चांदी बद्दल तज्ज्ञांचे मत
ट्रेडबल्स सिक्युरिटीज (Tradebulls Securities) करन्सी अँड कमोडिटी ज्येष्ठ संशोधन विश्लेषक भाविक पटेल सांगतात की, अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 1.9 ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेजला मंजुरी दिली आहे. अमेरिकन बॉन्ड यील्डही आता स्थिर आहे. सोन्याच्या किंमतींनी या सकारात्मक भावनेतून रिकव्हरी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात, मजबूत डॉलर आणि वाढत्या रोखे उत्पन्नामुळे सोन्याने 8 महिन्यांच्या नीचांकाला स्पर्श केला. सोने खरेदीबाबत सांगायचे झाले तर सोने दरात घसरण झाली की सोने खरेदी करणे योग्य आहे. कारण सोने आता अधिक मजबूत स्थितीत दिसून येत आहे. सोने 45800 दरात खरेदी करु शकता. 4,6500 रुपयांचे लक्ष्य ठेवा आणि 45500 च्या स्टॉपलॉसवर थांबा आणि खात्री करुन घ्या.