Gold Price Today: कमोडिटी बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा नरमाई दिसून आली आहे. मात्र, सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. तुम्ही देखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज मौल्यवान धातुच्या किंमतीत 1040 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 463 रुपयांनी घसरुन 81,161 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. तर हेच चांदी सोमवारी 81,624 रुपयांवर स्थिरावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतराराष्ट्रीय बाजारातील कल आणि स्थानिक विक्रेत्यांची मागणी यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 950 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार प्रतितोळा सोन्याची किंमत 65,650 रुपये इतकी आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 780 रुपयांनी वाढली आहे. आज सोनं 53,720 रुपये प्रतितोळा इतकी आहे. 


सोमवारी परदेशी बाजारात सोनं 50 डॉलरची उसळी घेत 2500 डॉलरच्या जवळ पोहोचले, तर चांदी अडीच टक्क्यांनी वाढून 28 डॉलरच्या वर पोहोचली. या कालावधीत देशांतर्गत वायदे बाजारात सोने 900 रुपयांनी आणि चांदी 1100 रुपयांनी वाढली होती, मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रॉफिटबुकिंग झाली आणि यूएस स्पॉट गोल्ड 0.4% घसरून $2,462.19 वर आले.


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  65, 650  रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  71, 620 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  53, 720  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 565 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 162 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 372 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 520 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 296 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    42, 976 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 65, 650  रुपये
24 कॅरेट- 71, 620 रुपये
18 कॅरेट-  53, 720  रुपये