Gold Price Today Update : दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्या-चांदीला चांगली मागणी असते. मात्र यावेळी मागणी असूनही सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही. 19 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. आज दोन्ही बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. (gold silver rate update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव?


दिवाळी 2022 च्या आधी, भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये (Indian Futures Market) सोन्याच्या किमतीतही घट झाली आहे. तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव सुरुवातीच्या व्यापारात 0.08 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीचा दर आज MCX वर 0.05 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.


MCX वर आज सकाळी 9:05 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 40 रुपयांनी घसरून 50,374 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर आज 26 रुपयांनी वाढून 56,380 रुपये प्रति किलो झाला आहे. सोन्याचा भाव आज 50,397 रुपयांवर उघडला गेला.


आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती काय आहे?


आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात नरमाई आहे. जागतिक बाजारात आज सोन्याची स्पॉट किंमत 0.04 टक्क्यांनी घसरून $1,650.13 प्रति औंस झाली. तर चांदीची स्पॉट किंमत 0.34 टक्क्यांनी वाढून $18.72 प्रति औंस झाली.


वाचा :Corona च्या धर्तीवर Diwali आधीच महाराष्ट्रात Alert जारी 


तज्ञ काय म्हणतात?


धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची मागणी वाढते आणि मागणी वाढली की, सोन्याच्या भावातही वाढ दिसून येते. यावेळीही धनत्रयोदशीसाठी सोन्या-चांदीच्या नाण्यांची बुकिंग आणि खरेदी सुरू झाली आहे. मात्र आतापर्यंत सोन्याच्या दरात केवळ घसरण दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात तो 49000 ते 51000 रुपयांपर्यंत राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.