नवी दिल्ली : सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या दरम्यान मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा भाव 236 रुपयांनी घसरला. त्यामुळे MCXवर सोन्याचा दर 51,780 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचा भाव 860 रुपयांनी कमी झाला असून चांदीचा भाव 66,207 रुपये प्रति किलो इतका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरांचा नवा रेकॉर्ड होऊ शकतो. जेपी मॉर्गनच्या एका रिपोर्टनुसार, आर्थिक परिस्थिती, कोरोना महामारी आणि राजकीय परिस्थिती पाहता दिवाळीपर्यंत सोनं 70 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जरी कोरोनाची लस आली तरीही जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तोपर्यंत सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.


या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 39 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. मात्र पुढील सहा महिन्यात सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ पाहायला मिळाली. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत सोनं ६०० पटींनी महागलं; १९४७ मध्ये काय होता सोन्याचा भाव?


कोरोना काळात गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीकडे कल वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्था तसंच शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोनं ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे. 


कोरोना संकटातही सोन्या-चांदीच्या वाढत्या किंमतीमागे 'ही' आहेत कारणं