Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण; 8 हजार 800 रूपयांनी घसरले सोन्याचे दर
काय आहेत आजचे सोन्याचे दर...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना देखील सोन्याची मागणीत सतत वाढ नोंदवण्यात येत आहे. आज सोने वायदामध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. सध्या सोन्याच्या दरात 120 रूपयांची घसरण झाली आहे. त्यांमुळे आज सोन 47 हजार 400 रूपयांवर ट्रेड करत आहे. 2020 च्या तुलनेत सोन्याचे दर कमी झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. पण प्रत्येक शहरांमध्ये सोन्याचे दर कमी जास्त असतात.
दिवस सोने
सोमवार 47 हजार 410 ग्रॅम
मंगळवार 47 हजार 612 ग्रॅम
बुधवार 47 हजार 179 ग्रॅम
गुरुवार 47 हजार 237 ग्रॅम
शुक्रवार 47 हजार 538 ग्रॅम
दोन आठवड्यांपूर्वीचे दिन सोन्याचे दर
दिवस सोने
सोमवार 47 हजार 225 ग्रॅम
मंगळवार 47 हजार 280 ग्रॅम
बुधवार 47 हजार 132 ग्रॅम
गुरुवार 47 हजार 169 ग्रॅम
शुक्रवार 47 हजार 158 ग्रॅम
दरम्यान; गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर जवळपास 60 हजार रूपयांवर पोहोचले. पण 2021मध्ये सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण तज्ज्ञाच्या मतानुसार 2021 वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर पुन्हा 60 हजार रूपयांवर जाण्याची शक्यता आहे.