Gold Silver Price on 29 March 2023 : आजच्या दिवशी तुम्ही देखील सोने खरेदीला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोने खरेदीदारांना कालच्या तुलनेत आज कमी खर्च करावा लागेल. कारण आज राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोने-चांदीचे दर (Gold Price Today) 240 रुपये आणि 300 रुपयांनी घसरले आहेत. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याची (22 Carat Gold Price) किंमत 54,500 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची (24 Carat Gold Price) किंमत 59,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत (Mumbai Gold Price) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,490 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,440 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात (Pune Gold) 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दर 54,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,440 रुपये आहे. नागपुरात (nagpur gold) 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,440 रुपये आहे. नाशिकमध्ये (nashik gold) 22 कॅरेट सोन्याचा दर 54,520 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,470 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅम चांदीचा आजचा दर 730 रुपये आहे. त्यामुळे आज तुम्ही स्वस्तात मस्त सोने-चांदी खरेदी करु शकतात.   


वाचा: आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, रोहित शर्मा अचानक संघाबाहेर? 


चांदीच्या किमतीत घसरण (Silver Price)


तर आज चांदीच्या किमतींमध्ये किरकोळ घसरण दिसून आली आहे. आज तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी 73,000 रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा कारण सध्या चांदीची किंमत जास्त आहे.


वायदे बाजाराची स्थिती


जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारात दिसून येत नाही. एमसीएक्स सोने एप्रिल फ्युचर्स 174 रुपयांच्या वाढीसह 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहेत. त्याच वेळी, चांदीचा मे फ्युचर्स 158 रुपयांच्या वाढीसह 70, 084 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. कालच्या घसरणीनंतर आज खरेदी वाढल्याने देशांतर्गत वायदे बाजारात सराफाच्या किमतीत मजबूती दिसून येत आहे.


मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या


22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 


अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या


आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.