Gold Price Today: मोठी बातमी! पाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ
Gold Price Today: सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा मोहोल सुरू आहे त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी (Gold Price in MCX) ग्राहकांनी दुकानात गर्दी केली असेलच. त्यातून स्थानिक बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ (Gold Price in Domestic Market) झालेली पाहायला मिळते आहे. सोबतच मागणीही जोरदार आहे तेव्हा जाणून घेऊया की आजच्या किमतींमध्ये काय उलथापालथ झाली आहे.
Gold and Sliver Price Today: लग्नसराईच्या मौसमात आणि ऐन गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरांमध्ये (Gold Rates) मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये सोन्याच्या दरानं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यामुळे मध्यवर्गीयांच्या (Gold Rate High Record) खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी सोन्याच्या भावांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्यानं 60 हजारच्या पार किंमत गाठली आहे परंतु आज सोन्याचे भाव उतरल्याचे (Gold Price Today in Mumbai) दिसत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर कमी झालेले दिसत असून काही भागात स्थानिक बाजार सोन्याचे भाव जैसे थे आहेत. (gold price today gold price rate hit high record today in domestic market see the latest price in your area)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव विक्रमी पातळी गाठत आहेत. त्यानुसार आता सोन्याच्या दरांमध्ये दिवसागणिक मोठी वाढ झाल्याचे दिसले. आज म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर घटल्याचे दिसत आहेत. काल म्हणजे सोमवारी, 20 मार्च रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आणि सोनं हे 1 हजार रूपयांवरून वाढून 61 हजारांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यातून येत्या काही दिवसांमध्येही सोन्यात ही वाढ पाहायला मिळणार असल्याची शक्यताही जाणकारांनी वर्तवली आहे.
सोन्याच्या मागणीत वाढ
सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून सोन्याच्या मागणीतही (Demand in Gold) प्रचंड वाढ झाली आहे. 18 मार्च रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तेव्हा सोन्याचे दर हे 1,630 रूपयांनी वाढून 60,320 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले होते. 19-20 मार्च रोजी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचे मिळत असून सोन्याचे दर हे उतरल्याचे दिसत आहेत. तेव्हा येत्या सणासुदीला भाव उतरल्याचेही पाहायला मिळेल.
सोन्याचा विक्रमी चढउतार
समोर आलेल्या आजच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. येत्या काळात सोन्याच्या दर वाढ होण्याची चिंता असताना आता सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. सोन्याचे आजचे दर हे कालच्या दरापेक्षा 540 रूपयांनी घसरून 59,780 रूपये प्रति 10 ग्रॅमवरती आल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या ही वाढ कशी असेल यावर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे कारण उद्या सोन्याच्या मागणीत मोठी हालचाल असेल. उद्याच्या गुढीपाडव्याला सोन्याचे दर काय असतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.