नवी दिल्ली : देशात अनलॉक 1 सुरु झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जवळपास 70 दिवसांनंतर सराफा बाजार सुरु करण्यात येत आहे. लोकल बाजारात सराफा दुकानं लॉकडाऊन 4.0 दरम्यानच सुरु होत होती. मात्र देशातील प्रमुख सराफा बाजार 1 जूनपासून हळू-हळू सुरु होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते. सध्याचं शेअर मार्केटमधील अनिश्चिततेचं वातावरण पाहता गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीसाठी कल आहे. त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमती दोघांमध्येही वाढ पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर (ibjarates.com) सोन्या-चांदीचे भाव अपडेट होत असतात.


इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 47,184 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 43,221 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोमवारी संध्याकाळी सराफा बाजार बंद होण्यावेळी सोन्याचा दर 47,043 रुपये होता.


तर चांदीचा दर 340 रुपयांच्या वाढीसह 49,670 रुपयांवर पोहचला आहे.



भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारला; आतापर्यंत ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे


दिल्लीतील कपिल ज्वेलर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते आपलं दुकानं सुरु करत आहेत. ग्राहकही येत आहेत, परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना दागिने पुरवता येत नाहीत. कारण, लॉकडाऊनदरम्यान, त्यांचे कारागीर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे आता कारागीर परत येईपर्यंत काही सांगता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.



मुंबईपासून ४५० किमी दूर समुद्रात कमी दाबाचा पट्टा, १२ तासांत निसर्ग वादळात रुपांतर होणार