मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. कमॉडिटी बाजारात मोठे बदल होत असल्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये सतत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे बडे साठेबाज, सराफ व्यापारी आणि ट्रेडर्स चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी उच्चांक गाढलेल्या सोन्याच्या किंमतीत या महिन्यात ५ हजार रूपयांपर्यंत घट झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर ५६ हजार रूपयांवर पोहोचले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज सोने २४० रूपयांनी महागले असून सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१६८८ रुपये आहे.  चांदीचे दर दाखील वाढले आहेत. चांदीचा भाव १२९० रुपयांनी वाढला असून तो एक किलोला ७०१२८ रुपये झाला आहे.


goodreturns या वेबसाईटनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर ५० हजार ४७० रूपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे दर ५१ हजार ४७० रूपये आहे. शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीमध्ये ११० रूपयांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचे भाव  ५० हजार २० रूपये असून २४ कॅरेट सोन्याचे दर ५४ हजार ५६० रूपये आहे.