मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात सध्या चांगलीच वाढ होताना दिसत आहे. सण आणि लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 5 महिन्यांनंतर पुन्हा 49 हजार रुपयांच्या पुढे गेला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरूवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 769 रुपयांनी वाढून 49 हजार140 रुपये झाले आहे. यापूर्वी जून 2021 मध्ये सोन्याचा दर 49 हजार रुपयांच्या पुढे गेला होता.


चांदीमध्ये मोठी उडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदी पुन्हा एकदा ६६ हजार रुपयांच्या वर गेली. 1 किलो चांदीचा भाव 66 हजार 348 रुपये होता. या दरम्यान किंमतीत 1 हजार 792 रुपयांची उसळी दिसून आली. तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.


वायदे बाजारातही सोने आणि चांदी चमकली


वायदे बाजारात सोने आणि चांदी चमकली. एमसीएक्सवर सोने 452 रुपयांच्या वाढीसह 49 हजार 306 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 727 रुपयांनी वाढून 66 हजार 605 रुपयांवर पोहोचला आहे.


सोने विक्रमी 7 हजार रुपये दूर


गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी अजूनही आहे. वास्तविक, सोन्याचा भाव अजूनही विक्रमी उच्चांकी 7 हजार रुपयांच्या खाली आहे.
2020 मध्ये कोरोनाच्या वेळी सोन्याने 56 हजार 200 रुपयांची पातळी गाठली होती. त्याचवेळी सर्वसामान्य खरेदीदारांसाठी सोने अजूनही 7 हजार रुपयांनी स्वस्त आहे. सोन्याची सध्याची किंमती 49 हजार 140 रुपये आहेत, जे विक्रमी उच्चांकापेक्षा 7 हजार 060 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहेत.


न्यूयॉर्कमध्येही सोने चमकले


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1 हजार 861.24 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. न्यूयॉर्कमध्येही जूनमध्ये सोन्याचा भाव 1861 डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचला होता. येथेही 5 महिन्यांनंतर सोने पुन्हा या पातळीवर आले आहे. चांदीचा दरही 25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.


तज्ञांचे मत काय आहे?


IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते, सण आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या ही मागणी पुढील दोन महिने कायम राहू शकते. वर्षअखेरीस सोने 50 हजार होऊ शकते. त्याचबरोबर परदेशात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता गुंतवणूकदारही सोन्याकडे वळतील. अशा परिस्थितीत नवीन वर्षातही सोन्यामध्ये तेजी दिसून येऊ शकते.